कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही : मेधा पाटकर
X
शेतकऱ्यांना पारतंत्र्यात नेणारे कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठीच मुंबई आंदोलन केले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. भारतीय राज्यघटने नुसार संपत्ती काही ठराविक व्यक्तीकडे केंद्रीत होता कामा नये असं असताना आबांनी यांचे एका दिवसाचे उत्पन्न हे इतके आहे. त्यांच्या २७ मजली इतक्या मोठ्या घरात २७ लोक सुद्धा राहत नाहीत अस असताना गरीब लोकांनी जगायचं कस असा प्रश ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.
केंद्राने लागू केलेले कायदे मागे घेण्यात यावी यासाठी मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्या उपस्थित होत्या. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी दिल्ली येथे मोठं आंदोलन उभारलं आहे. सरकार सोबत ८ वेळा चर्चा होऊन देखील यातून काही मार्ग निघाला नाही म्हणून आता सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याने स्थगिती देत आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. कायदे मागे घ्यावे यासाठी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मुंबई येथे आंदोलन केले यावेळी त्यांनी संपूर्ण कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही हेच सांगण्यासाठी आज मुंबई येथे आलो आहे.
पंजाबचे शेतकरी पाकिस्तानी किंवा खलिस्तानी नाहीत. याना चीन किंवा पाकिस्तान कडून कोणीही पैसे पुरवत नाही. तर ही लंगर सेवेची परंपरा पुढे चालवत सत्याग्रहाची, अहिंसक लढाई चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात पंजाबचे संयुक्त किसन समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.