राज्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे ढग; पुढील 4 दिवस महत्त्वाचे - IMD
X
राज्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलंच झोडपले आहे. या पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाब आणि शाहीन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या जखमा ताज्या असताना आता पुन्हा एकदा IMD भारतीय हवामान खात्याने आता पुढील 4-5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या माहितीनुसार पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यासाठी हवामान खात्याचे वतीने दिलेल्या सुचनांमध्ये विजा चमकताना बाहेरचे काम टाळा, तसंच त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.
पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह🌩🌧 जोरदार पावसाची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते.
IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR
अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
कुठं होणार पाऊस...
केरळच्या जवळच्या अरबी समुद्रात पुढच्या 48 तासात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्मा़ण हो़ण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये राज्यात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Under the influence, Isol heavy to very heavy falls very likely ovr TN, Kerala & Coastal & South Interior Karnataka 4-6 Oct & isol heavy falls over these areas during next 24 hrs.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
राज्यात पण द. कोकण, मध्य महाराष्ट्रात ४-६ Oct दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
- IMD https://t.co/tw4ME1mrFz