उत्पन्नापेक्षा 118% (टक्के) संपत्ती जास्त; ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल
उत्पन्नापेक्षा 118% (टक्के) संपत्ती जास्त;ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
X
उत्पन्नापेक्षा 118% (टक्के) संपत्ती जास्त;ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरुन शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी अडचणीत सापडले आहेत. आमदार राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध आज गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप
उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती 2 कोटी 92 लाख अंदाजे असून त्यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा साळवी यांनी ही बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तांची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरी पुन्हा छापे मारले.
जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ आमदार साळवी यांची चौकशी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सुरू आहे. यात त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, त्यांचे भाऊ दीपक तसेच पुतण्या अथर्व याचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली आहे.चालू महिन्यातच सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम संपले आहे. आमदार साळवी तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर आता गुरुवार १८ रोजी सकाळी ९.८ वाजता आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.