Home > News Update > सदावर्तेंच्या गाडीची तोड-फोडीचे आम्ही समर्थन करत नाही - मनोज जरांगे पाटील

सदावर्तेंच्या गाडीची तोड-फोडीचे आम्ही समर्थन करत नाही - मनोज जरांगे पाटील

सदावर्तेंच्या गाडीची तोड-फोडीचे आम्ही समर्थन करत नाही - मनोज जरांगे पाटील
X

ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील (Mumbai) क्रिस्टल टॉवर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय. यावेळी कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड करताना 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा दिल्या. दरम्यान यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान मुंबईतील क्रिस्टल टॉवर या परीसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, घटना स्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तोड फोड करणाऱ्या तरूणांना तात्काळ ताब्यात घेतले असून यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

यासंदर्भात मनोज पाटील जरांगे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की " माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिब पोरांना आरक्षण मिळू नये. यासाठी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी विरोधात काम केलं आहे. आमची लेकरं मोठी होऊ नये असं सरकारला वाटतंय. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही, हा प्रकार मला माहित नाही. आमच्याकडून शांततेत आंदोलन सुरू असल्याचं जरागें पाटील म्हणाले आहेत.



Updated : 26 Oct 2023 3:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top