Home > News Update > 2 सप्टेंबरला ओझरखेडा तलावांमध्ये पाणी सोडणार

2 सप्टेंबरला ओझरखेडा तलावांमध्ये पाणी सोडणार

2 सप्टेंबरला ओझरखेडा तलावांमध्ये पाणी सोडणार
X

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची ओझरखेडा तलावातून पाणी मिळावं अशी अनेक वर्षाची मागणी आहे, मी मंत्री असताना तलावाची निर्मिती केली होती. तापी नदीतून जे पाणी वाहून जात असतं ते पाणी या तलावांमध्ये टाकावं आणि या तलावातील पाणी शेतकऱ्यांना द्यावं ,असे या पाण्याचं रिझर्वेशन करण्यात आलेला आहे त्यानुसार 2 सप्टेंबरला या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या आधी रिझर्वेशन नुसार पाणी दिलं जात नव्हतं तेंव्हा म्हणून रोहिनी खडसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली, तातडीने रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक जयंत पाटील यांनी घेतली, या बैठकीत निर्णय घेण्यात आल्यामुळे 2 सप्टेंबरला या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Updated : 29 Aug 2021 2:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top