गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे
X
भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. कोरोनावर घरगूती उपाय करू नका असे सल्ले देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही नेते आपल्या अकलेचे तारे तोडत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत.
भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी देखील असेच अकलेचे तारे तोडण्याचं काम केलं आहे. सध्या सुरेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये हे महाशय
मी स्वत:गोमुत्र पितो आणि स्वस्थ राहतो. माझं म्हणणं आहे की, आपण सुद्धा हे गोमुत्र घ्यावं. मी रोज दात घासल्यानंतर पाच झाकणं थंड पाण्यात टाकून पितो. हे पिल्यानंतर 18 तास मी लोकांमध्ये असतो. फक्त आणि फक्त गायीचं गोमूत्र प्यायल्यानंतर तुम्ही कोरोनासारख्या महामारीपासून दूर राहू शकतात.
असं आमदार महोदय या व्हिडीओत सांगत आहेत.
पाहा नक्की काय म्हटलंय आमदार महोदयांनी