Home > News Update > समीर वानखेडे यांच्या प्रकरणात वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांची एन्ट्री ; औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल

समीर वानखेडे यांच्या प्रकरणात वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांची एन्ट्री ; औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल

समीर वानखेडे यांच्या प्रकरणात वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांची एन्ट्री ; औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल
X

औरंगाबाद : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या प्रकरणात वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दिली होती.

मागील दीड-दोन महिन्यांपासून नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काही थांबायला नाव घेत नाही. मलिक यांच्याकडून दररोज नवनवीन आरोप केले जात आहे. तर दुसरीकडे वानखेडे कुटुंबाने मलिकांविरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. तसेच समीर वानखेडेंच्या धर्माबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, वानखेडे कुटुंबीयांनी मुस्लिम असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई यांनी मलिक यांच्या आरोपांमुळे सातत्यानं समाजात आणि नातेवाईकांत बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. त्यामुळं या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.

Updated : 7 Dec 2021 4:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top