Home > News Update > मास्क काढा मग बोला.....असं सांगणाऱ्या 'त्या' डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

मास्क काढा मग बोला.....असं सांगणाऱ्या 'त्या' डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

मास्क काढा मग बोला.....असं सांगणाऱ्या त्या डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
X

राज्य व देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर शासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत . अशातच डॉक्टर व कर्मचारी डबल मास्क लावून कोरोना रुग्णांवर उपचार करताना दिसतायेत, मात्र दुसऱ्या बाजूला

हे सर्व नियम धाब्यावर बसवून कोणतीही परवानगी न घेता कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर उपचार करून करून हजारो लोकांना बरे केल्याचा दावा करत कोरोना प्रतिबंधक लस संबंधी सोशल मीडियावर गैरसमज पसरवणाऱ्या त्या डॉक्टर विरोधात अखेर आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

वांगणी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शीला क्लिनिकमध्ये डॉ . उमा शंकर गुप्ता हे गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीरपणे उपचार करत आहेत . त्यांच्याजवळ उपचार करण्याची कोणतीच शासकीय परवानगी नाही , असे असताना ते कोरोना संसर्गाचे सर्व नियम मोडून

विना मास्क न लावता कोरोना रुग्णांना बरं करत असल्याचा दावा करत कोरोना प्रतिबंधक लस संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर गैरसमज पसरून रुग्णांची दिशाभूल केली जात होती . अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून डॉ . उमा गुप्ता व त्यांच्या एका सहकारी महिला डॉक्टर विरोधात बदलापूर पूर्व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यापूर्वी देखील अनेक आजारांसाठी डॉक्टर गुप्ता यांनी अवैज्ञानिक दावे करून रुग्णांना बरे केल्याचे दावे केले आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात पालेगावातील एक 30 वर्षाचा मुलगा, निलेश परशुराम म्हसकर सकाळी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. किंचित तापही होता. त्याला कोरोना झाला हे स्पष्ट नव्हते. कुणीतरी त्यांना वांगणी येथील डॉक्टरचा पत्ता दिला, पैसे जास्त घेतो पण एका दिवसात बरा करतो. म्हणून घरच्यांनी थेट वांगणी गाठली होती.

डॉ. गुप्ता हे उत्तर भारतीय असून निलेश वेटिंग वर होता, दम लागत होता, डॉक्टर ने तपासले, आणि 1 लाख आता भरा, 1 लाख संध्याकाळी 5000 नंतर जाताना, असे 2 लाख 5000 होतील असं सांगितलं होतं.

निलेश चा ऑक्सिजन कमी झाला होता, तशा ही परिस्थितीत त्या पत्र्याच्या खोलीत त्याला झोपून नुसते इंजेक्शन देत होता.

सायंकाळी निलेश जास्त सिरीयस झाला, तरी पुन्हा 1 लाख घेतले, आणि रात्री 9 वाजता निलेश च्या नातेवाईकांना सांगितले आता घेऊन जा, तब्बेत जास्त आहे, रात्री ते मझ्याकडे आले, मी आणि निलेशचे नातेवाईक खुप हॉस्पिटल फिरलो, व्हेंटिलेटर नाही मिळाला, आमची हार झाली,बिचाऱ्या निलेश ची प्राणज्योत मावळली, बिचारा निलेश दिवसभर विनाकारण चुकीचे उपचार घेत राहिला. निलेश च्या अगोदर एक अडवली गावतील महिला तिथे मृत झाली असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

डॉ.गुप्ता यांनी अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची दिशाभूल करून मोठी माया कमावल्याने कोट्यावधी रुपये तेथील स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा केल्याची कुजबूज परिसरात आहे.

मास्क घालून प्रवेश नाही असा भारतातील पहिला छोटा टपरी दवाखाना, वांगणी पश्चिम,येणार का बघायला ? अशी ही सोशल मीडिया वरून चर्चा असते.जर एका दिवसात कोरोना पेशंट पूर्ण बरा होत आहे तर WHO ने त्याला सन्मानित करावा, अन्यथा अटक करावा अशी मागणी स्थानिक डॉक्टरांनी केली होती.

डॉ. गुप्ता च्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

डॉक्टर गुप्ता, दररोज 20 ते 25 पेशन्ट, मास्क लावनाऱ्या माणसाला प्रवेश नाही, म्हणजे मास्क लावला तर चालायला लागा हा नियम कोरोनाचा रिपोर्ट काढायचा नाही, कोरोना चा इलाज 165000 ते 205000 एक दिवसाचा,

भाषा रफ, ज्याला कुठे बेड मिळत नाही त्यांना जास्त चार्ज, आहे, वांगणी ग्रामपंचायत ,वांगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या डॉक्टर चे कार्य चालू आहे, दवाखाना 2 ते 3 कॉट, चार्ज एका रुगणाचे 2 लाखाच्या कमी नाही,

Updated : 9 May 2021 11:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top