वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 15 दिवसाची सीआयडी कोठडी
वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 15 दिवसाची सीआयडी कोठडी ; केज न्यायालयात रात्री उशिरापर्यंत सुनावणी...!
X
राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला के ज न्यायालयाने 15 दिवसांची सी आय डी कोठडी सूनावली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथे दि. 06 डिसेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागितल्या प्रकरणी झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले सरपंच संतोष देशमुख यांचे सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी दिनांक 09 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून केला. तसेच दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांनी फोन वरून दोन कोटी रू. ची लाच मागितली म्हणून आवादा एनर्जी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या फिर्यादी वरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी.काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गु र नं. 638/2024 भा. न्या. सं. 308(2), 308(3), 308(4), 308(5) 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान.दिनांक 09 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाल्या नंतर या हत्याकांडाशी खंडणी प्रकरण सबंधित असून त्या दिवसा. पासून वाल्मीक कराड फरार होता.
दरम्यान वाल्मीक कराड याने दि. 31 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथील सीआयडी कार्यालयात हजर होत आत्मसमर्पण केले. त्या नंतर त्याला सी आय डी च्याच पथकाने रात्री 10.00 वाजता के ज पोलीस ठाण्यात आणून त्याला रात्री 10.45 वा. सुमारास केज येथील क स्तर कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पावस्कर यांनी त्याला दि. 14 जानेवारी 2025 पर्यंत 15 दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे.