Home > News Update > मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान ; पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान ; पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर चार जागांसाठी आज मतदान होत आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
X

मुंबई // सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नारायण राणे यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर चार जागांसाठी आज मतदान होत आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आठही उमदेवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 191 मतदार मतदान करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. निवडणूक प्राधिकरणाने मतदानासाठी शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी. एस. हायस्कूलची निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले यांनी याबाबत माहिती दिली असून मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनन पुरेपूर काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खटाटोप करण्यात येत होता. यात काही प्रमाणात यश मिळाले. एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर उमेदवारांची बिनिरोध निवड करण्यात आली. तर चार जागांवर एकमत न झाल्याने येथे निवडणूक होत आहे. दरम्यान या निवडणुकीत कोणाची सरशी होणार आणि कोणाच्या पदरात अपयश पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनन मुंबई बँकेच्या संचालकपदी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आहेत.

Updated : 2 Jan 2022 9:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top