बीड विधानपरिषदेच्या मतदानाची तारीख ठरली, पुन्हा भाऊ-बहिणीत जुंपणार.
X
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यपदाचा दि. २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळं विधानपरिषदेतील रिक्त झालेल्या एका जागेकरिता निवडणूक आयोगाने दि. ३ जानेवारी, २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
हे ही वाचा
इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?
रवीश कुमार यांचा ब्लॉग : आपल्याच देशातील आठ राज्यांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जाता येत नाही
इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?
या निवडणुकीचे मतदान दि. २४ जानेवारी, २०२० (शुक्रवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व मतमोजणी दि. २४ जानेवारी, २०२० (शुक्रवार) रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.
त्यामुळं या निवडणुकीत भाजप कोणाला संधी देणार? पंकजा मुंडे यांचं मत विचारात घेतलं जाणार का? यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसची हक्काची जागा असलेल्या या जागेवर आता कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं आहे.