रायगडमध्ये २१० ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरवात
धम्मशिल सावंत | 5 Nov 2023 10:08 AM IST
X
X
रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. 210 पैकी 38 सरपंच तर 1 हजार 854 पैकी 565 सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहेत. 168 सरपंच तर 1291 सदस्य पदाच्या जागेसाठी आज मतदान होत आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने बिनविरोध सरपंच, सदस्य विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पद, तर काही ठिकाणी सरपंचपदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत मतदानासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
Updated : 5 Nov 2023 10:08 AM IST
Tags: Gram Panchayat Gram Panchayat news Gram Panchayat election Raigad Raigad latest news Raigad Gram Panchayat
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire