अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतसाठीच्या मतदानाला सुरुवात
अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यात कर्जत, पारनेर, अकोले नगरपंचायतीचा समावेश आहे. एकूण 17 जागा असलेल्या नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या गोंधळामुळे तेरा जागेवरच निवडणूक होत आहे
X
अहमदनगर // अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यात कर्जत, पारनेर, अकोले नगरपंचायतीचा समावेश आहे. एकूण 17 जागा असलेल्या नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या गोंधळामुळे तेरा जागेवरच निवडणूक होत आहे.
कर्जत नगरपंचायतमध्ये भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मोठ्या प्रचार सभा आणि प्रचाराची रणधुमाळी उडवत उमेदवार फोडण्यापासून उमेदवार पळवणेपर्यंत घटना या निवडणुकीच्या माध्यमातून पहा पाहायला मिळाल्या.
भाजपच्या उमेदवाराकडून ऐन वेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली आहे. तर भाजपच्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने अकरा जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
तर , पारनेर नगरपंचायतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होत असून आज 9722 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. 13 जागांसाठी निवडणूक होत असून एकूण 16 मतदान केंद्र आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असताना दुसरीकडे पारनेरमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत सरळ लढत होत आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिणच्या दोन्ही नगरपंचायत निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.