Home > News Update > गुजरातमध्ये परिस्थिती वाईट! उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 3 दिवस पडून होता मृतदेह...

गुजरातमध्ये परिस्थिती वाईट! उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 3 दिवस पडून होता मृतदेह...

गुजरातमध्ये परिस्थिती वाईट! उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 3 दिवस पडून होता मृतदेह...
X

सौजन्य - सोशल मिडीया 

देशात रविवारी २ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशभर कोरोनाने हाहाकार माजवला असताना गुजरातमधील एका रुग्णालयात धक्कादायक बातमी समोर आली आहे.

sandesh.com या गुजराती वेबपोर्टलवर ही बातमी दिली असून त्यामध्ये गुजरात मधील वालसाड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वालसाड जिल्ह्यातील एका कोरोना रुग्णालयात एक मृतदेह तीन दिवस उपचार सुरु असलेल्या रुग्णासोबत ठेवण्यात आला.

मृत व्यक्तीला शवगृहात न पाठवता उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबतच ठेवल्याने तीन दिवसांनी या मृत व्यक्तीच्या शरिराची दुर्गंधी पसरू लागलीय.

गुजरातमधील खेरगावमधील निरूबेर गुलाबभाई गंगोदा यांचा १५ एप्रिलला मृत्यू झाला होता. मात्र, तीन दिवस झाले असतांना देखील त्यांच्या परिवाराला त्याचं शव देण्यात आलं नव्हतं.

याबाबत रुग्णालयात चौकशी केली असता शव ठेण्यासाठी असलेलं फ्रिजर खराब झाल्यानं त्यांना बेड्सवर ठेवण्यात रुग्णालयाने म्हटलं आहे. रुग्णालयाद्वारे केला जाणारा या प्रकारामुळे इतर रुग्णांसह मृत व्यक्तींच्या परिवारांला देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती अहमदाबादमधील काही रुग्णालयांची सुद्धा आहे. रुग्णालयातील शवगृहाबाहेर रांगाच्या रांगा लागल्याचं कळतंय.

Updated : 18 April 2021 11:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top