Home > News Update > उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे विवेक पंडित यांनी मानले आभार

उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे विवेक पंडित यांनी मानले आभार

जव्हार मोखाड्या मजुरांची साताऱ्यातून सुटका करताना केलेल्या मदतीबाबत फडणवीसांना माहिती देताना व्यक्त केल्या भावना

उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे विवेक पंडित यांनी मानले आभार
X

ऊसतोड कामगार म्हणुन पालघर जिल्हयातील जव्हार मोखाड्यातून साताऱ्यात गेलेल्या मजूरांना श्रमजीवी संघटनेच्या पथकाने यशस्वीपणे मुक्त केले. या मुक्तीच्या मोहिमेत कार्यकर्त्यांना पूर्ण मदत मिळावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी (IAS) यांनी केलेली मदत अत्यंत मोलाची होती असे सांगत विवेक पंडित यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. याबाबत विवेक पंडित यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संदेश पाठवत डॉ.श्रीकर परदेशी यांनी तसेच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी,पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मजूर वेठबिगार बांधवांच्या मुक्तीसाठी संवेदनशीलता दाखवत केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सहा दिवसांपासून साताऱ्यातील ठेकेदाराकडून या कामगारांना डांबून ठेवून काम करून घेतले जात होते, सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे हे सत्य समोर आले होते. यानंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी तातडीने कार्यकर्त्यांचे एक पथक जव्हार येथून साताऱ्यात रवाना केले, या पथकाला साताऱ्यात रवाना केले. या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मजुरांची भेट घेत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सोबतीने या मजूर वेठबिगार आदिवासींना त्यांच्या कुटुंबीयांसह मुक्त केले. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मजूरांना सुखरूप आपल्या घरी आणण्याचे काम श्रमजीवी संघटनेच्या लढवय्या कार्यकर्त्यांनी विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाने केले आहे. एका वायरल व्हिडिओची दखल घेऊन सर्वसामान्य गरीब आदिवासी मजुरांच्या मदतीला धावणारी श्रमजीवी संघटनाच आहे हे पुन्हा एकदा या घटनेने सिद्ध झाले.

या घटनेत अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी संपर्क,प्रवास, मार्गदर्शन केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी अत्यंत मोलाची मदत केली. महापालिका आयुक्त,जिल्हाधिकारी तसेच पंतप्रधान कार्यालय अशा अनेक ठिकाणी आपल्या कर्तुत्वाने छाप उमटविणारे एक संवेदनशील अधिकारी म्हणून परदेशी यांची ओळख आहे. डॉ. परदेशी यांच्यासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी , पोलीस आधिक्षक समीर शेख यांचे देखील पंडित यांनी आभार व्यक्त केले.

Updated : 10 Jan 2024 8:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top