Home > News Update > विराट कोहली म्हणजेच आरसीबी हे जणू एक समीकरणचं; 'या' कारणासाठी विराट RCB साठी महत्वाचा

विराट कोहली म्हणजेच आरसीबी हे जणू एक समीकरणचं; 'या' कारणासाठी विराट RCB साठी महत्वाचा

विराट कोहली म्हणजेच आरसीबी हे जणू एक समीकरणचं; या कारणासाठी विराट RCB साठी महत्वाचा
X

विराट कोहली (Virat Kohli) म्हणजेच आरसीबी (RCB) हे जणू एक समीकरणचं झाले आहे. पण यंदाच्या IPL सीझन नंतर विराट आरसीबीचा कर्णधार राहणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यात केकेआरने मात दिल्याने यंदाच्या स्पर्धेतून आरसीबी बाहेर गेली असून विराटचं RCB चा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मात्र असं असलं तरीदेखील आरसीबी संघाच्या सुरुवातीपासूनच्या काळाच विराटच महत्त्वपूर्ण कामगिरी करतांना दिसत आहे. सर्वाधिक भागिदारी करणाऱ्यांमध्ये विराटच्या नावाचा समावेश आहे.

यामध्ये सर्वात पहिलं नाव येत विराट आणि एबी डिव्हिलीयर्स यांचं. या जोडीने 2016 साली तब्बल 939 धावां एकत्र भागिदारी करुन केल्या होत्या. या दोघंनंतर नंबर लागतो यंदा पार पडलेल्या पर्वातील विराट आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) जोडीचा. यंदाही या दोघांनी मिळून तब्बल 601 धावा केल्या आहेत.

आरसीबीकडून विराट आणि ख्रिस गेल (Chirs gayel) जोडीनेही कमाल भागिदारी केली आहे. 2012 साली त्यांनी मिळून 593 धावांचा डोंगर उभा केला होता.

या भागिदारीच्या रेकॉर्डमध्ये विराट आणि केएल राहुल जोडीचे नावही येते. या दोघांनी आयपीएल 2016 मध्ये 574 धावा मिळून भागिदारीमध्ये केल्या होत्या.एकूणच काय तर IPL मधील ही धावांची आकडेवारी पाहिली तर नक्कीच विराट हा RCB चा कणा आहे असंच म्हणावं लागेल. मात्र त्याने यंदाच्या सीझन नंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Updated : 12 Oct 2021 7:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top