Home > News Update > विरारची घटना काही राष्ट्रीय बातमी नाही; टोपेंच असंवेदनशील विधान

विरारची घटना काही राष्ट्रीय बातमी नाही; टोपेंच असंवेदनशील विधान

विरारची घटना काही राष्ट्रीय बातमी नाही; टोपेंच असंवेदनशील विधान
X

मुंबईच्या विरार येथील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या 13 कोरोना रूग्णांच्या मृत्यूवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असंवेदनशील विधान केलं आहे.

कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीवर पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना, राजेश टोपे म्हणाले की, ही घटना राष्ट्रीय बातमी नाही,पण आम्ही आमच्या सरकारतर्फे मदत करणार आहोत. महानगरपालिका आणि सरकार दोन्ही मिळून 10 लाखांची मदत मृत्यू रूग्णांच्या कुटुंबाला दिली जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

टोपे यांनी केलेल्या या विधानावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधानावरून राजेश टोपेंवर निशाणा साधला आहे.

राज्यात निष्पाप लोक होरपळून मरताहेत एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहेत.

माणसं हवालदिल झालीत त्यांना आधाराची गरज आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे विरार सारखी घटना "नॅशनल न्यूज" नाही म्हणत, जखमेवर मीठ चोळायचं काम करताहेत,अशी टीका भाजप नेत्या चित्र वाघ यांनी केली आहे.


राज्यात निष्पाप लोक होरपळून मरताहेत एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहेत


तर राजेश टोपे याना आता घरी बसवण्याची वेळ आली असल्याची टीका, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही तासांपूर्वी केली होती.त्यानंतर काही वेळातच टोपेंच हे विधान समोर आल्याने भाजपकडून पुन्हा टोपेंवर टीका होण्याची शक्यता आहे.

Updated : 23 April 2021 11:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top