EXCLUSIVE : अंबरनाथमध्ये खुलेआम सट्टेबाजी
अंबरनाथमध्ये खुलेआम सट्टेबाजी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पोलिसांना देऊनही कारवाई नाही
X
लॉकडाउन असो की भारत बंद असो की आणखी काही, बेकायदेशीर धंदे मात्र राजरोसपणे सुरू असतात. दारूची दुकाने बंद असताना गावठी दारूचे पाऊच विकून लॉकडाउनमध्ये अनेक दारुविक्रेते करोडपती झाल्याची च्राच आहे. आजही पोलीस मास्क घातला का नाही? लायसन्स आहे का हे काम इमानदारीत करताना दिसतात. मात्र सट्टेबाजांना मोकळे रान आहे. कळवा, मुंब्रा, कल्याण, उल्हासनगर येथे राजरोसपणे सट्टेबाजी सुरू आहे.
याचे एक ठळक उदाहरण अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला स्वामीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसते. इथे राजसोरपणे सट्टेबाजी सुरू असल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कल्याणकर यांनी तयार केला आहे. अवैध प्रकाराला वाचा फुटावी म्हणून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तो व्हिडिओ दिला. पण पोलिसांनी दोन दिवस झाले तरी कारवाई नाही केली म्हणून त्यांनी हा व्हिडिओ मॅक्स महाराष्ट्रचे किरण सोनवणे यांना दिला. याबद्दल अधिक माहिती दिली आहे. किरण सोनवणे यांनी....