Home > News Update > कॉंग्रेसला प्रणिती शिंदेंना जळगाव दौरा महागात पडला; कॉंग्रेसच्या आजी माजी आमदारांवर गुन्हा दाखल

कॉंग्रेसला प्रणिती शिंदेंना जळगाव दौरा महागात पडला; कॉंग्रेसच्या आजी माजी आमदारांवर गुन्हा दाखल

कॉंग्रेसला प्रणिती शिंदेंना जळगाव दौरा महागात पडला; कॉंग्रेसच्या आजी माजी आमदारांवर गुन्हा दाखल
X

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांचा जळगाव दौरा कॉंग्रेसला महागात पडला आहे. कॉंग्रेसच्या आजी माजी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याच्या कारणावरून जळगाव पोलीस प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे जळगाव अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तसंच पक्षीय संघटना वाढीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी बैठक घेतली होती. मात्र, यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. या बैठकीत गर्दी जमा होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंदी असतांना काँग्रेसचा राजकीय कार्यक्रम

कोरोनांच्या भीषण काळात कोणतेही राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतांना काँग्रेसने नियम धाब्यावर बसवले, प्रणिती शिंदे यांना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काँग्रेसने जबाबदारी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार पक्ष बांधणीसाठी प्रणिती शिंदे या दौऱ्यावर आल्या होत्या. 15 तारखेला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेच्या पर्यंत अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती, या बैठकीला रावेर मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी, माजीं खासदार डॉ उल्हास पाटील जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील उपस्थित होते .

कोणा कोणावर दाखल झाले गुन्हे

या बैठकीला उपस्थित असलेले रावेर मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य 20 ते 25 जणांवर पोलिसांनी ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल केला: पोलीस अधीक्षक

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामग्रहावर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी IPC नुसार 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरु आहे. अशी माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

Updated : 19 May 2021 7:03 PM IST
Next Story
Share it
Top