'मी माझी चूक सुधारेन, पक्षाने आपली चूक सुधारावी'- विनोद तावडे
Max Maharashtra | 4 Oct 2019 11:47 AM IST
X
X
विनोद तावडे यांचं भाजप पक्षाच्या चौथ्या उमेदवार यादीतही नाव न आल्याने पक्षावर नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्यामुळे त्यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना माझी काही चूक झाली असल्यास मी सुधारेन आणि पक्षाची काही चूक असल्यास पक्ष सुधारेल. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्याकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता अखेर कट, कोणाला मिळाली उमेदवारी वाचा
- विनोद तावडेंच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन छत्रपती संभाजीराजेंचा संताप...
विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाने मला तिकीट का दिले नाही याचे आत्मपरीक्षण करत असून आता फार विचार करत बसण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सोबतच पक्ष जी जबाबदारी देईल ती पुढे पार पाडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/kJ-5owteZvw
Updated : 4 Oct 2019 11:47 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire