ठाण्यातील रुग्णालयात विनोद कांबळी यांना उपचारासाठी केले दाखल
ठाण्यातील रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी केले दाखल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 24 Dec 2024 3:30 PM IST
X
X
ठाण्यातील कशेळी येथील रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली असता त्यांना कावीळसह व्हायरल इन्फेक्शन असल्याचे समजले तसेच मेंदूला देखील थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे मात्र अजून पाच ते सहा दिवसानंतर ते या आजारातून पूर्ण बरे होतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे
Updated : 24 Dec 2024 3:30 PM IST
Tags: admitted hospital Thane treatment विनोद कांबळी maxmaharashtra marathi news news क्रिकेट Cricket
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire