विनायक मेटे यांचा अपघात की घातपात? चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
X
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचा अपघात झाला की घातपात? असा सवाल चर्चिला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचा अपघात की घातपात याविषयी चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपास यंत्रणा कामाला लावली असून लवकरच सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे या तपासातून सत्य लवकरच बाहेर येईल. तसंच विनायक मेटे यांच्या कुटूंबियांची मागणी असेल तर ती पुर्ण केल्या जाईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, मेटे हे माझे अत्यंत जिवाभावाचे मित्र होते. तसंच त्यांचा सामाजिक, भौगोलिकसह सर्वच प्रश्नांची जाण होती. त्यामुळे आता ते आमच्यात नाहीत, या गोष्टीवर आमचा विश्वास बसत नाही. त्यामुळेच त्यांचा अपघात झाला की घातपात याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा कामाला लावली आहे. त्यातून सत्य नक्कीच बाहेर येईल, असंही बावनकुळे म्हणाले.