त्या दिवशी काय घडले होते, मेटे यांच्या ड्रायव्हरने सांगितली हकीकत
X
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर यामागे घातपात आहे का याची चौकशी करण्याची मागणी जोर धरते आहे. दरम्यान विनायक मेटे यांच्यासोबत अनेकवर्ष ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या समाधान वाघमारे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला तीन ऑगस्ट रोजी पुणे रस्यावर शिक्रापूर येथे एका गाडीने दोनवेळा कट मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे. त्या दिवशी आपणच गाडी चालवत होतो, तसेच त्या गाडीने दोनवेळा कट मारल्यानंतर आपण मेटे यांना याबाबत सांगितले, पण घाई असल्याने आता थांबायला नको, असे त्यांनी सांगितल्याची माहिती वाघमारे यांनी दिली आहे.
३ ऑगस्टचे हायवेवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तर कट मारणाऱ्या अर्टिगा गाडीची माहिती मिळू शकते, आणि त्यातून मेटे यांच्या अपघाताचे धागेदोरे मिळू शकतात, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या आदिवशी त्यांच्यासोबत आपण गाडी चालवत असतो तर अपघात झालाच नसता असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच विनायक मेटे यांच्या गाडीतील दोनच एअर बॅग उघल्या पण मागची का उघडली नाही, असाही प्रश्न आपल्याला पडला असल्याचे त्यांनी सांगितले.
आता त्यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या या नवीन माहितीमुळे मेटे यांच्या गाडीच्या अपघातामागे घातपात आहे का असाही सवाल आता उपस्थित झाला आहे. मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील मंगळवारी घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.