Home > News Update > गोदावरीतच ठिय्या, अवैध वाळू उपशाविरोधात गावकरी आक्रमक

गोदावरीतच ठिय्या, अवैध वाळू उपशाविरोधात गावकरी आक्रमक

गोदावरीतच ठिय्या, अवैध वाळू उपशाविरोधात गावकरी आक्रमक
X

जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडीतील ग्रामस्थांनी अवैध वाळू उपशा विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांनी शनिवारी सकाळीच गोदावरी नदीपात्रात ठिय्या करून जल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात स्थानिक भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील सहभागी झाले आहेत. गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. परिणामी ग्रामस्थांना खारे पाणी पिण्याची वेळ आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तसेच शेतीला देखील खारे पाणी देण्याची वेळ आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. नुकतेच वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यात पडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटनी देखील घडली आहे. त्यामुळे इथले टेंडर रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात गावातील महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. यापूर्वी देखील ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं. मात्र प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे या ग्रामस्थांनी जलआंदोलन केले आहे. सकाळपासूनच महसूल प्रशासनासह पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा याठिकाणी ग्रामस्थांनी घेतला, तर काही संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन खाडे यांना घेराव घातला आहे.

Updated : 4 Jun 2022 6:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top