विजय वडेट्टीवार यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार
X
चंद्रपूर : चुकीच्या माहितीच्या आधारे जो काही पत्र प्रपंच केला आहे. त्याला माझं उत्तर आहे की तू माझं शिक्षण काढण्याअगोदर कोकणातून जे नेते झालेत ते आता केंद्रीय मंत्री झालेत त्यांचं किती शिक्षणं आहे? ते बघ, चंद्रपूर जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री आहेत ते किती शिकलेत? याची जरा माहिती घे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघात केला आहे. सोबतच पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांची दारूच्या व्यवसायात भागीदारी असल्याचा आरोप केला होता यावर प्रत्युत्तर देताना जर माझ्या नावावर माझ्या नातेवाईकांच्या नावावर एकही भागीदारी असेल तर राजकारण सोडून देईल, मात्र माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला नाही तर तुझ्यावर 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करून तुला गडचिरोली, चंद्रपूरच्या चकरा मारायला लावेल अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पडळकरांवर सरसंधान साधले आहे.
संपूर्ण चंद्रपूर जिल्हा साक्षीला आहे, हा माणूस चुकीची माहिती घेऊन आरोप करत आहे. कोण घेत आहे टक्केवारी? फुकटच्या प्रसिध्दीसाठी वाटेल त्या पद्धतीने घाणेरडे आरोप करणं सोडून दे. नाही तर आम्हाला ही बोलता येत. माझी जाहीर माफी मागावी लागेल नाही तर मानहाणीचा दावा टाकेन असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.