पीएम केअर फंडातून आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट; आमदार सतीश चव्हाण यांचा आरोप
X
पंतप्रधान सहाय्यता निधीतून (पीएम केअर फंड) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) देण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट असून आयसीयू कक्षात लावण्याचा दर्जा नसल्याचे घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. तसा अहवालच या डॉक्टरांनी दिला आहे. विशेष म्हणजे हे व्हेंटिलेटर दुरुस्त देखील होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या व्हेंटिलेटरच्या दर्जावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे.
पीएम केअर फंडातून घाटी रूग्णालयाला साधारण १५० व्हेंटिलेटर देण्यात आल्याचं समजतंय. मात्र, हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून आयसीयू कक्षात लावण्याच्या दर्जाचे नसल्याचे घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. तसा अहवाल देखील यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे. या संदर्भात कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे.
मदत करता येत नसेल तर करू नका. मात्र असे निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे देऊन कृपया रूग्णांच्या जीवाशी खेळू नका. असे सुनावतानाच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवणार्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी राज्यसरकारकडे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.