वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी च्या वाटेवर
X
पुणे - वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ह्याचं पार्श्वभूमीवर वसंत मोरे आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे यांचे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत फोनवर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
मनसेला राम राम ठोकल्या नंतर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना भेट देत महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र मी लोकसभा लढवणारच या मतावर वसंत मोरे ठाम आहेत. मी अपक्ष उमेदवारी भरणार अशी भूमिका देखील मोरे यांनी घेतली होती.
वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची काल भेट घेतली. यादरम्यान वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून. वसंत मोरे हे आज मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमीच्या नंतर वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार असू शकतात का हे स्पष्ट होईल. मात्र उमेदवारी अजून निश्चित झाली नसून त्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र या माहितीनंतर वसंत मोरे हे वंचितच्या वाटेवर जातील का? त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल? अशा विविध चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.