वरुण गांधींचे तिकीट रद्द, ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार ?
X
रविवारी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची पाचवी यादी (BJP Candidate List 2024 ) जाहीर केली. यात पिलीभीतचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi ) यांचे नाव नाही. मात्र, त्यांच्या आई मनेका गांधी (Menka Gandhi )यांना सुलतानपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
त्यामुळे वरुण गांधींचे तिकीट रद्द झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. वरुण गांधींचे तिकीट कापले, आता ते काय करणार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की कोणत्याही पक्षात प्रवेश करणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
वरुण गांधी हे पीलीभीतचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, आता त्यांच्या जागी भाजपने राज्य सरकारचे मंत्री जितिन प्रसाद यांना तिकीट दिल्यानं गांधी यांची गोची झाली आहे. त्यामुळं वरुण गांधी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी अटकळ आहे. अशा स्थितीत वरुण गांधी पुढे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपने त्यांच्या आई मेनका गांधी यांना तिकीट दिल्याने वरुण गांधी यांच्यासाठी तिकीट मिळण्याची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. यामुळे वरुण गांधींसाठी आता भाजपचे उमेदवारी तिकीट मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याने समाजवादी पक्ष त्यांना तिकीट देऊ शकतो का? की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे
वरुन गांधी यांचा आपल्याचं भाजप सरकारवर हल्लाबोल
वरुण गांधी अनेक मुद्द्यांवरून आपल्याच पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल करत होते. बेरोजगारीपासून ते शेतकऱ्यांपर्यंतच्या मुद्द्यांवरून वरुण गांधींनी आपल्याच पक्षाच्या सरकारला धारेवर धरले होते. वरुण गांधी यांनी अलीकडेच पीलीभीत स्थानकावर आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्यांसोबत स्टेज शेअर केला होता आणि तेव्हापासून त्यांच्या आणि पक्षामध्ये सर्व काही ठीक होईल अशी अटकळ बांधली जात होती. या कार्यक्रमात वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. मात्र, रविवारी वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करण्यात आले. अशा स्थितीत पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा स्थितीत वरुण गांधीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, त्यांच्या मनात वरुणबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. इतर पक्षांचे नेते आमच्यात सामील झाल्यास विचार केला जाईल, असे अखिलेश यादव म्हणाले होते. समाजवादी पक्षाने पिलीभीतमधून भागवतशरण गंगवार यांना आधीच तिकीट दिले आहे, जरी त्यांनी स्वतः वरुण गांधींसाठी जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गंगवार म्हणाले होते, “जर वरुण गांधी सपामध्ये सामील झाले तर मी त्यांच्यासाठी माझी जागा सोडण्यास तयार आहे. हायकमांडने मला तिकीट दिले आहे, वरुण आला तर मी आनंदाने जागा सोडेन.
त्यामुळे वरून गांधी यांना लोकसभा उमेदवारी भाजपची दारे बंद झाल्याची चर्चा असली तरी समाजवादी पार्टी आणि अपक्ष उमेदवारी लढवण्याची मार्ग मोकळा आहे त्यामुळे वरून वरुन गांधी हे या चक्रव्हिवातून कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे