पंकजा मुंडे यांना झटका, वैद्यनाथ अर्बन बॅकेच्या अधिकाऱ्याला अटक...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Sept 2021 2:31 PM IST
X
X
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांना हा झटका समजला जात आहे.
उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याच घोटाळ्याप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती, आता ही दुसरी अटक करण्यात आली आहे.
Updated : 4 Sept 2021 2:31 PM IST
Tags: Pankja Munde bjp urban bank
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire