Home > News Update > नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा ओमिक्रॉनबाबत गंभीर इशारा

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा ओमिक्रॉनबाबत गंभीर इशारा

भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओमिक्रॉन बद्दल गंभीर इशारा दिला आहे

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा ओमिक्रॉनबाबत गंभीर इशारा
X

नवी दिल्ली// जगभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची भिती पसरली आहे. हा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटचाय तुलनेत वेगाने पसरत असल्याचं संशोधकांनी मान्य केलं आहे. त्यामुळे जगभरातल्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. ब्रिटनमध्ये शुक्रवारी दिवसभरात तब्बल ९३ हजार कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे सर्वच देशांना यातून सतर्कतेचा संदेश मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिलाय.

डॉ. व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे.

जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरत असलेल्या कोरोनाचा विचार केला तर तशाच प्रकारचा रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाल्यास देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील", असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले आहेत.

Updated : 18 Dec 2021 9:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top