आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त व्हिडीयो नंतर ANI ने जारी केला नवीन व्हिडीओ
X
ANI ने योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिलेली शिवीचा व्हिडीओ डीलिट करून नवीन व्हिडीओ जारी केला आहे. या बाइटमध्ये अगोदर योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिलेली शिवी वगळण्यात आलेली आहे.
काय आहे प्रकरण?
देशातील नामांकित न्यूज एजन्सी ANI च्या पत्रकाराला मुलाखत देत असताना कॅमेरा हलला म्हणून उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'ए चूतिया' अशी शिवी दिली होती. हा योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ युथ कॉंग्रेसचे नेत श्रीनिवास बीव्ही यांनी ट्वीट केला आहे.
या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ कोरोना व्हॅक्सीन मोफत दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरोग्यमंत्र्यांचे आभार मानतात. या व्हिडीओच्या चित्रीकरणादरम्यान काही तांत्रीक अडचण निर्माण झाली. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्या पत्रकाराला असभ्य भाषेचा वापर केल्याचं दिसून येतंय.
इस वीडियो को देखकर शायद आप शर्मिंदा हो जाये:-
— Srinivas B V (@srinivasiyc) April 5, 2021
अजय बिष्ट, मीडिया का कितना सम्मान करता है
पूरे 8 सेकेंड्स में जानिए हालात-ए-पत्रकारिता..👇 pic.twitter.com/UYQXHcOyxv
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. मात्र, एनआयए ने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शिवी दिलेला व्हिडीओ कट करून नवीन बाईट प्रसिद्ध केला आहे. हा बाईट प्रसिद्ध करताना मागील व्हिडीओमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दुसरा व्हिडीओ प्रसिद्ध करतअसल्याचं ANI ने म्हटलं आहे.
Video byte of UP CM Yogi Adityanath on Covid vaccination
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2021
(Editors note: Earlier issued Live Sound byte is retracted) pic.twitter.com/td9qQHSnrX
या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीच्या आधी पाणी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद पद्धतीने हाकलून दिल्याचा व्हिडीयो सोशल मिडीया वर व्हायरल झाला होता. लोकांसमोर आपला चांगला चेहरा जावा म्हणून प्रयत्न करणारे अनेक राजकीय नेते कॅमेरामागे मात्र, अशा पद्धतीने वागताना दिसतात अशी टीका समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे.