Home > News Update > कोरोना व्हायरस चीन च्या वुहान लॅबमधून लीक झाला?: अमेरिकेचा रिपोर्ट

कोरोना व्हायरस चीन च्या वुहान लॅबमधून लीक झाला?: अमेरिकेचा रिपोर्ट

कोरोनाचा विषाणू नक्की कसा तयार झाला, त्याची कारण काय? या विषाणूला जबाबदार कोण? अमेरिकेचा अहवाल काय सांगतो वाचा

कोरोना व्हायरस चीन च्या वुहान लॅबमधून लीक झाला?: अमेरिकेचा रिपोर्ट
X

2020 ची सुरुवात ही कोरोना व्हायरस सारख्या धोकादायक विषाणूने झाली. या विषाणूने आता जगभरात हाहाकार माजवला असून कोट्यावधी लोकांचा या विषाणूने जीव घेतला आहे. परंतू आत्तापर्यंत हे कळालेलं नाही की हा व्हायरस कुठून आला? कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण हा चीनच्या वुहानमध्ये आढळला, त्यामुळे इथल्या लॅबवर सुरुवातीपासूनच शंका घेतली जात होती.

मात्र, आता अमेरिकेच्या एका रिपोर्टमधून याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. चीनमधील वुहान लॅबमधूनच हा विषाणू पसरला. कोरोना विषाणूबद्दल अमेरिकन सरकारकडून संशोधन सुरु आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, चीनमधील वुहान लॅबमधूनच हा विषाणू बाहेर आल्याची शक्यता आहे. मात्र, यावर अजून संशोधन सुरु आहे.

सोमवारच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या अहवालाचा हवाला देऊन याबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. 2020 मध्ये कॅलिफोर्नियाच्या लॉरेंस लिवमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेने या विषाणूचा अभ्यास सुरू केला होता. ट्रम्प सरकार असतानाच राज्य विभागाने व्हायरसच्या मूळ स्रोताच्या तपासणीचे आदेश दिले होते.

दरम्यान, लॉरेंस लिवमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेने वॉल स्ट्रीट जर्नलच्या या रिपोर्टबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, जो बायडन यांनी देखील हा व्हायरस कुठून आला? हे शोधण्यासाठी आम्ही आवश्यक ते आदेश दिले असल्याची माहिती दिली होती.

प्रयोगशाळे व्यतिरिक्त आणखी एका सिद्धांतावर संशोधन

सध्या अमेरिकेतील इंटेलिजन्स एजन्सीज दोन सिद्धांतांवर काम करत आहे. पहिलं चीनच्या वुहान लॅबमध्ये झालेल्या अपघातानंतर हा विषाणू माणसांमध्ये पसरला आहे. आणि दुसरं म्हणजे विषाणूचा संसर्ग झालेले प्राणी मानवाच्या संपर्कात आले असावेत. दरम्यान अमेरिकेच्या संशोधनात आता प्रयोगशाळेच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत आहे.

यापूर्वीही व्हायरस संदर्भात अमेरिकेने एक रिपोर्ट दिला होता. ज्यामध्ये असा दावा केला गेला होता की, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान लॅबचे काही वैज्ञानिक आणि संशोधक अचानक आजारी पडले होते. कोरोनाचीच लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, चीनने वुहान लॅबमधून व्हायरस पसरल्याचे नेहमीच नाकारलं आहे. मात्र, अमेरिकेचे म्हणणे आहे की, चीन निष्पक्ष चौकशीला परवानगी देत नाही. द वायर ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

Updated : 8 Jun 2021 12:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top