अमेरिकेचे अफगाणिस्तानातील ISISच्या तळांवर ड्रोन हल्ले
X
काबूल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांमध्ये 150 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISISच्या अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेट खोरासान संघटनेने घेतली आहे. ही संघटना ISISची अफगाणिस्तानातील संघटना आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये अमेरिकेचे 13 लष्करी जवान ठार झाले आहेत. तर उर्वरित अफगाणा नागरिक आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शुक्रवारी रात्री ISIS खोरासानच्या अफगाणिस्तानातील तळांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये काबूल बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड ठार झाल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानच्या नानगहर प्रांतात हा ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.
दरम्यान काबूल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता असल्याची शक्यता अमेरिकेने वर्तली आहे. तसेच अमेरिकन नागरिकांनी विमानतऴावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. काबूल विमानतळावर अजूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.