Home > News Update > ''माझ्या जीवाला धोका...'' उर्फीचे महिला आयोगाला पत्र

''माझ्या जीवाला धोका...'' उर्फीचे महिला आयोगाला पत्र

माझ्या जीवाला धोका... उर्फीचे महिला आयोगाला पत्र
X

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेला वाद पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, राज्यातील महिलांचे तसेच इतर अनेक महत्त्वाचे सर्व प्रश्न संपून गेले की काय? राज्याच्या राजकारणात सध्या उर्फी जावेदची जोरदार चर्चा आहे. या एका नवख्या अभिनेत्रीची राज्याच्या राजकारणात चर्चा होण्याचं कारण आहे तिचे हटके कपडे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही असं म्हणत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर उर्फी जावेद व चित्रा वाघ वाद सुरू झाला...

या दोघींमध्ये सुरू असलेला हा वाद मागच्या अनेक दिवसांपासून मिटण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. चित्रा वाघ आता उर्फी जावेद विरोधात आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्यांना जशास उत्तर उत्तर उर्फी कडून दिले जात आहे. माझ्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाला पत्र पाठवलं असून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. या पात्राबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट द्वारे म्हंटले आहे की, "मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत. सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी''

बाकी हा वाद आता कधी संपणार माहित नाही पण या गदारोळात राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत का? राज्यातील प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा वाद पेटवला जात आहे का?

Updated : 17 Jan 2023 1:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top