Home > News Update > शहरी नक्षलवाद वेगाने वाढतोय, त्वरीत कारवाई करा ; शरद पवार यांची सूचना

शहरी नक्षलवाद वेगाने वाढतोय, त्वरीत कारवाई करा ; शरद पवार यांची सूचना

शहरी नक्षलवाद वेगाने वाढतोय, त्वरीत कारवाई करा ;  शरद पवार यांची सूचना
X

गडचिरोली // राज्यातील बड्या शहरांमध्येही शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार हे गडचिरोलीत बोलत होते. नक्षलवाद विरोधी कारवाईत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागपूर ते पुण्यापर्यंत शहरी नक्षलवाद पसरत आहे. त्यामुळे शासन- प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे. या शहरी नक्षलवादावर कारवाई केली नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असं पवार यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीतील सुरजागड खाणीत 10 हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. नव्या पिढीला तणावातून बाहेर काढायचे असेल तर रोजगार निर्मिती करणे गरजेची आहे, असंही पवारांनी म्हटले आहे. शहरी नक्षलवाद पुणे, मुंबईतही आहे. केरळमध्येही असे लोक आहेत. हा वर्ग समाजात असून सरकारच्या विरोधात द्वेष पसरविण्याचं काम करत आहे, असं पवार म्हणाले.

शनिवारी गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पवारांनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी तरुणांशी संवाद साधला आणि त्यांना मुख्यप्रवाहात येण्याचं आवाहन केलं.

Updated : 19 Nov 2021 9:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top