Home > News Update > UPSC चा निकाल लागला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कश्मिरा संखे प्रथम

UPSC चा निकाल लागला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कश्मिरा संखे प्रथम

UPSC Topper 2023: UPSC ने २०२२ मध्ये घेतलेल्या परिक्षेत इशिता किशोर (Ishita Kishore) देशात पहिली आलीय. तर गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि उमा हराथी (Uma Harathi) अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत. त्यामुळं सलग दुस-या वर्षीही मुलींनीच युपीएससीच्या परीक्षेत बाजी मारलीय.

UPSC चा निकाल लागला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कश्मिरा संखे प्रथम
X

युपीएससी ने एकूण ९३३ उमेदवारांना नियुक्तीसाठी शिफारस केली होती. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार केल्यानंतर युपीएससी ने ९३३ उमेदवारांची निवड यादी तयार केली होती. ९३३ पैकी सर्वसाधारण गटातून ३४५, आर्थिक दुर्बल गटातून ९९ उमेदवार, ओबीसी संवर्गातून २६३ तर एससी संवर्गातून १५४ आणि एसटी संवर्गातून ७२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

UPSC ने जाहीर केलेल्या निकालात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. त्यात इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती एन, स्मृती मिश्रा, मयूर हजारिका, गहना नव्या जेम्स, वसीम अहमद भट, अनिरुद्ध यादव, कनिका गोयल, राहुल श्रीवास्तव हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.

महाराष्ट्रातून ठाणे येथील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.

Updated : 23 May 2023 4:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top