Home > News Update > United Nation of Kailasa : फरार नित्यानंदने स्थापन केला नवा देश

United Nation of Kailasa : फरार नित्यानंदने स्थापन केला नवा देश

बलात्काराच्या आरोपी असलेल्या स्वामी नित्यानंदने कैलास या नव्या देशाची स्थापना केली. या देशाने नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा येथील बैठकीत भाग घेतला.

United Nation of Kailasa : फरार नित्यानंदने स्थापन केला नवा देश
X

भारतामध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या स्वामी नित्यानंदने (Swami Nityanand) नव्या देशाची स्थापना करून या देशाचे नाव कैलास (kailasa country) ठेवले आहे. या देशाने नुकत्याच जिनिव्हा (geneva) येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (United Nation meeting) बैठकीत भाग घेतला होता. दरम्यान या बैठकीत स्वामी नित्यानंदने भारताकडून आपला छळ होत असल्याचे म्हटले आहे. स्वतःला विजयप्रिया नित्यानंद (Vijaypriya Nityanand) असं म्हणवणारी महिला कैलासची राजदूत म्हणून जिनिव्हा येथे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या बैठकीत सहभागी झाली होती. यावेळी विजयप्रिया नित्यानंद या महिलेने सांगितले की, त्याच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाईटवरही अपलोड केला आहे. यावेळी विजयप्रिया नित्यानंद यांच्याबरोबर पुरुष प्रतिनिधी एन कुमार (N Kumar) हे सुध्दा बैठकीत बोलले. यावेळी एन कुमार म्हणाले, बाहेरील पक्षांच्या संसाधनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच अनेकदा देशातील स्थानिक कायदे देशातील शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध लादतात, असंही एन कुमार यांनी म्हटले आहे.

कैलास हा आहे हिंदूंचा देश (Kailasa is a hindu civilization Nation)


कैलास हे कथित विषुवृत्तावरील (ecuadorial country) किणारपट्टीवर स्थित आहे. या देशाचा स्वतःचा ध्वज, रिझर्व्ह बँक (Reserve Bank of Kailasa) आणि पासपोर्टही आहे. या देशाच्या वेबसाईटवर देशाचे वर्णन पृथ्वीवरील सर्वात मोठे हिंदू राष्ट्र (Nation of Hindu) असा केला आहे. याबरोबरच ज्यांना स्वतःच्या देशात हिंदू धर्माचे पावन करण्याचा अधिकार नाही. अशा देशातील वंचित हिंदूंसाठी स्थापन केलेले सीमा नसलेले राष्ट्र असे या देशाचे वर्णन केले आहे.

2019 मध्ये नित्यानंद झाला होता फरार

नित्यानंदवर भारतीय दंड संहितेनुसार बलात्कार, छळ, अपहरण आणि मुलांना चुकीच्या पध्दतीने कैद करून ठेवणे अशा वेगवेगळ्या प्रकरणांचा आरोप होता. तो 2019 मध्ये देशातून फरार झाला होता. पुढे जानेवारी 2020 मध्ये त्याच्या विरोधात इंटरपोलने ब्यु कॉर्नर नोटीस जारी केली होती. तसेच 2010 मधील बलात्कार प्रकरणात नित्यानंदविरुध्द अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

Updated : 2 March 2023 8:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top