शेतकरी आंदोलन : आझाद मैदानातील आंदोलनाआधी कडक बंदोबस्त
अक्षय मंकणी | 23 Jan 2021 4:50 PM IST
X
X
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चाने 24 आणि 25 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यातून 20 हजार शेतकरी हे आंदोलनाला येणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हे आंदोलन 2 दिवस असणार आहे. एक दिवस आंदोलक शेतकरी हे आझाद मैदानातच मुक्काम करणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 25 तारखेला हे आंदोलक राजभवनावर मोर्चा काढून राज्यपालांना तीन कृषा कायदे रद्द करा असे निवेदन देणार आहेत.
Updated : 23 Jan 2021 4:50 PM IST
Tags: kisan morcha azad maidan
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire