Home > News Update > एका खड्ड्याचे एक स्वतंत्र निवेदन देऊन नगरकरांचे अनोखे आंदोलन

एका खड्ड्याचे एक स्वतंत्र निवेदन देऊन नगरकरांचे अनोखे आंदोलन

एका खड्ड्याचे एक स्वतंत्र निवेदन देऊन नगरकरांचे अनोखे आंदोलन
X



अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाला 1000 निवेदन देत मनविसे आणि 'आम्ही नगरकर' जोरदार आंदोलन केले.मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत नगरकरांकडून तीव्र आंदोलनं केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज देखील महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले. या आधी मनविसेच्या वतीने महापालिकेत खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्यानंतर खड्डे बुजवणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबाबत नगरकरांना आवाहन करण्यात आले होते, तसेच मनपा आयुक्तांना 'गांधारीरत्न' पुरस्कार पुरस्कार देखील मनसेच्या वतीने देण्यात आला होता. तरी देखील मनपाकडून रस्ता दुरुस्तीबाबत समाधानकारक काम होत नसल्याने आज

एका खड्ड्याचे एक वैयक्तिक निवेदन देण्याचे अनोखं आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान महापालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी आधीच स्पष्ट केले होते की, पाऊस थांबल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, तर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी देखील सर्व नगरसेवक तसेच सामान्य नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल मात्र, हे काम होताना दिसत नसल्यानेच आंदोलन करावे लागत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली जी डागडुजी केली जाते ती म्हणजे आजारापेक्षा औषध भयानक अशीच अवस्था झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सोबतच रस्ता बुजवण्याऐवजी रस्त्याला टेंगुळ आणण्याचे काम सुरू असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

रांग लावून दिले मागण्यांचे निवेदन

दरम्यान यावेळी नगरकरांनी रांग लावून महापालिका प्रशासनाला रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन दिले. दरम्यान यावेळी आयुक्त शंकर गोरे हे आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Updated : 5 Oct 2021 1:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top