Home > News Update > 'कसला शेंबड्या आमदार निवडून देता ' ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर टीका

'कसला शेंबड्या आमदार निवडून देता ' ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर टीका

कसला शेंबड्या आमदार निवडून देता  ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर टीका
X

सिंधुदुर्ग : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. "शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे." असं राणे म्हणाले. तर, एसटी संपावार तोडगा काढण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा असंही राणे म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना केंद्रीयमंत्री राणे म्हणाले, "शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या."

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरही कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली. सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला ? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी टीका राणे यांनी केली. मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली. मात्र, हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. अशी टीका केंद्रीयमंत्री राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली

Updated : 23 Nov 2021 6:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top