Home > News Update > केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस महाग वाटले !

केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस महाग वाटले !

केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस महाग वाटले !
X

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करावी या मागणीसाठी विरोध दररोज आंदोलन करत आहेत. महागाई वाढली असल्याने सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातर्फे कुणीही महागाईवर बोलत नाही, मात्र सध्या एका केंद्रीय मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मक्याचे १५ रुपयांचे कणीस त्यांना महाग झालेले वाटते आहे.

केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनीच हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये ते मध्य प्रदेशातील सिवनीहून मंडला येथे जाताना रस्त्यात मका विकणाऱ्या एका स्टॉलवर थांबले, तिथे पंधरा रुपयांना एक मका असा भाव ऐकून त्यांनी विक्रेत्याशी भावाबद्दल घासाघीस देखाली केल्याचे दिसते आहे. एवढेच नाही तर मक्क्याचे कणिस फुकटही मिळतात, असेही ते विक्रेत्या मुलाला सुनावताना दिसत आहेत.

त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी ट्रोल केले आहे. केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे एक कणिस महाग का वाटते आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.


Updated : 22 July 2022 5:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top