अंडरवर्ल्ड गँगस्टर अरूण गवळी सुटणार; नागपूर खंडपीठाचे आदेश..!
X
अंडरवर्ल्ड गँगस्टर असलेल्या गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. यावर उत्तर देण्यासाठी तुरूंग प्रशासनाला नागपूर खंडपीठाकडून चार आठवड्यांचा वेळही देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळी याने आपल्या शिक्षेत सूट मिळण्याची मागणी केली होती.
काय असेल तुरूंग प्रशानाचा निर्णय याकडे लक्ष?
नागपूर खंडपीठामध्ये कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याच्यावर सुनावणी झाली होती, परंतु कोर्टाकडून यावरचा निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्याचालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्यासंदर्भात उत्तर देण्यासाठी तुरूंग प्रसाशनाला चार आठवड्याचा कालावधी देण्यात आला असल्यामुळे, आता तुरूंग प्रशासन नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
हत्येप्रकरणी झाली होती दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणासह इतर गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी गँगस्टर अरुण गवळीला दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आता अरूण गवळी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.