ठाकरेंच्या नेतृत्वात १ जुलैला भ्रष्टाचाराविरोधात मुंबई मनपावर मोर्चा
X
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर जाहिर होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर येणारी निवडणुक लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान ठाकरे यांनी सांगीतले की राज्य सरकारतर्फे कारभार हाकून मुंबईची लूट सुरू आहे. महापालिकेच्या एफडी मोडल्या जात आहेत. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी शिवेसना (ठाकरे गट) येत्या १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. पक्षाच्या माजी नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होती. मुंबई महापालिकेच्या अनेक कामांमध्ये मागच्या वर्षभरात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्याचा हिशेब राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगीतल आहे. आज जागतिक गद्दार दिनाची मागणी केली होती. त्यामुळे तो दिन साजरा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगीतले. ते पूढे म्हणाले त्यांना एसआयटी स्थापन करून कोंडी करायचं तर करू देत. भ्रष्टाचार कोण करत आहे? हे आम्ही समोर आणतो अशा पध्दतीच प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिल.
अनेक प्रकल्पात कसा भ्रष्टाचार होत आहे? रस्ते घोटाळा खडी घोटाळा तो समोर आणला आहे.
मिंधे दिल्लीत सातत्याने का जातयंत? त्यांना नोटीस येत असतील 92 हजार कोटींची ठेवी सत्ताधारी लोक लुटत आहेत असेही सवाल ठाकरे यांनी उपस्थीत केले आहे.