युक्रेनला मानवतेच्या दृष्टीने मदत करा, संयुक्त राष्ट्र संघटनेचं जगाला आवाहन, भारत मदत करणार का?
X
रशियाने युक्रेन वर केलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक इमारतींच, घरांच नुकसान झालं आहे. अनेक लोक मरण पावले आहेत. अशा परिस्थितीत जगाने युक्रेनला मदत करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने जगाला केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात गुटेरेस यांनी काल दुपारच्या सुमारास युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बातचित केली. "युक्रेनच्या लोकांना मानवतेच्या दृष्टीने सहाय्य करण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा निर्धार महासचिवांनी राष्ट्रपतींना कळविला आहे."
Thousands of people have fled their homes in Ukraine and many are arriving in Moldova to seek safety. Local communities have come to help ⬇️ pic.twitter.com/PcKpO5mBEW
— UNHCR, the UN Refugee Agency (@Refugees) February 26, 2022
त्यानंतर युक्रेनमधील आमच्या मानवतावादी कार्यांना निधी द्या असं आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या संदर्भात सुरू असलेल्या तणावासंदर्भात रशिया विरोधात संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक ठराव मांडण्यात आला होता. या ठरावा संदर्भात घेण्यात आलेल्या मतदानात भारताने भाग घेतला नाही.
भारताच्या या भूमिकेचे जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रशिया हा भारताचा परंपारिक मित्र आहे. मात्र, रशियाच्या या कृतीचं भारताने समर्थन केलेले नाही. तसंच विरोधात देखील भूमिका घेतलेली नाही. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे भारतात देखील मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या तणावजन्य परिस्थितीत भारताने या दोघांचीही बाजू न घेता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, युक्रेनची परिस्थिती पाहता भारत युक्रेनला आता मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करणार का ? हा प्रश्न उपस्थित होतो.