Home > News Update > नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळेच उमेश कोल्हेंची हत्या

नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळेच उमेश कोल्हेंची हत्या

उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.

नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळेच उमेश कोल्हेंची हत्या
X

अमरावतीतील झालेली औषधी व्यापाऱ्याची हत्या ही नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे झाली, असा आरोप करण्यात आला होता . त्यानंतर NIA आणि ATSचं पथक अमरावतीत दाखल झालं आहे. दरम्यान उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

२१ जून रोजी अमरावतीतील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. ते आपलं दुकान बंद करून आपला मुलगा आणि सूनेसोबत घरी जात होते. यावेळी तीन दुचाकीस्वारांनी कोल्हेंवर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान कोल्हे यांनी नुपूर शर्माचे स्टेटस ठेवले होते, त्यामुळेच त्यांची हत्या केली, असा आरोप करत याबाबत तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले, "उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे." राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल या टेलरच्या हत्येनंतर देशात हि दुसरी घटना आहे जी नुपूर शर्मा प्रकरणामुळे घडली आहे.

Updated : 2 July 2022 7:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top