Home > News Update > Ukraine Russia War : सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका, भारतीय दूतावासाचे आवाहन

Ukraine Russia War : सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका, भारतीय दूतावासाचे आवाहन

रशिया आणि युक्रेनमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही युध्द सुरूच असून भारतीयांनी सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नये, असे आवाहन आपल्या नागरीकांना केले आहे.

Ukraine Russia War : सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका, भारतीय दूतावासाचे आवाहन
X

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युध्द तिसऱ्या दिवशीही कायम आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका, असे आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दामुळे जग दोन गटात विभागले गेले होते. मात्र तरीही भारताने कोणत्याही देशाची बाजू न घेता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले आहे. तसेच युध्द थांबण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र तिसऱ्या दिवशीही रशिया आणि युक्रेनमधील युध्द सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नका, अशी सूचना भारतीय दूतावासाने दिली आहे.

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांसह अणू उर्जा प्रकल्पावरही ताबा मिळवला आहे. तर युक्रेनची राजधानी कीववर हल्ला करत रशियन फौजांनी कीव ताब्यात घेतले आहे. तर सरकारी निवासस्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचे आवाज सुरू आहेत. या युध्दात शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच मुलभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या युध्दाची भीती जगभर पसरली आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय दुतावासाने शनिवारी एक नियमावली जारी करून नागरीकांना सीमेवरील चौक्या आणि दूतावासातील भारतीय अधिकाऱ्यांच्या सूचनेशिवाय कोणत्याही सीमेवरील चौक्यांवर जाऊ नका, असे बजावले आहे.

तसेच रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव वर क्षेपणास्रांचा हल्ला चढवला आहे. त्याबरोबरच कीव शहराच्या वायव्येला असलेले विमानतळ ताब्यात घेतले आहे.

Updated : 26 Feb 2022 10:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top