उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर
X
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सर्वचं राजकीय पक्षाच्या प्रचार सभा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी धाराशीव येथे सभा घेतली दरम्यान यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे. गडकरींनी भाजपचा राजीनामा द्यावा त्यांना महाविकास आघाडीतून निवडून आणू असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या भाजपची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये १९५ जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळात असणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. परंतू या यादी नितीन गडकरी यांचं नाव नसल्यानं भाजपवर जोरदार टीका होतं आहे.
दरम्यान या पार्श्वभूमिवर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकरींना ऑफर दिली आहे. ते म्हणाले की "नितीन गडकरी यांनी भाजप सोडून द्यावा, त्यांना महाराष्ट्रचं पाणी दाखवावं, महाराष्ट्राची धमक दाखवावी. महाराष्ट्र दिल्ली समोर केव्हाही झुकला नाही, त्यामुळे नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीतून निवडून आणू. असं धाराशीव सभेत ठाकरे म्हणालेत.