उध्दव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार ; संजय राऊत यांच्या विधानाने चर्चेला उधान
देशाला भविष्यात उध्दव ठाकरे यांच्या रूपाने प्रखर हिंदूत्ववादी, राष्ट्रवादी आणि संयमी नेतृत्व मिळेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उध्दव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना त्यांनी हे सुचक विधान केलं आहे.
X
देशाला भविष्यात उध्दव ठाकरे यांच्या रूपाने प्रखर हिंदूत्ववादी, राष्ट्रवादी आणि संयमी नेतृत्व मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे सुचक विधान केलं आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले आहे की , महाराष्ट्रावर महापुराचे संकट असतांना त्यांचा वाढदिवस साजरा करू नका. जी काही मदत करायची आहे ती महापुराने बाधित झालेल्यांना करा.
राज्यभरातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मिळत असतांना खासदार संजय राऊत यांनी देखील शुभेच्छा देतांना म्हटलं आहे की, मी मुख्यमंत्री ठाकरे यांना गेली पंचेचाळीस वर्षे ओळखतो आहे, मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेतच, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्राला देखील अपेक्षा आहे.राष्ट्राला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात जर लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत आणि ते करतील याची मला खात्री आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात त्यांनी जर देशाचं नेतृत्व केलं तर राज्यातील प्रत्येकाला आनंदच होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय चर्चाला उधान आलं आहे.