Home > News Update > महाविकास आघाडीतील जागावाटप वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे - रमेश चेन्निथला भेट

महाविकास आघाडीतील जागावाटप वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे - रमेश चेन्निथला भेट

महाविकास आघाडीतील जागावाटप वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे - रमेश चेन्निथला भेट
X

महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादावर मात करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पक्षांनी वाद मिटले असल्याचे चेन्निथला आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले.

गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत वाद झाला होता. या बैठकीत पटोले यांनी राऊत यांच्यावर टीका केली आणि जागावाटपाच्या चर्चेत पटोले उपस्थित नसावे अशी शिवसेनेची भूमिका होती. या वादामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते, त्यामुळे रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर जागावाटपाची चर्चा पूर्ण करू. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात एखाद्या जागेवरून चर्चा वाढत असते. शुक्रवारी दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, असे संजय राऊत यांनी सांगितले.


ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीला सक्षम बनविण्यासाठी काम करीत आहेत. त्यांचे मत विचारात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही मिळून एकत्र काम करणार आहोत, असे चेन्निथला म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच आम्ही पुन्हा एकत्र बसून कोण मुख्यमंत्री बनणार याचा निर्णय घेऊ. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. भ्रष्ट सरकारला हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचेही चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

Updated : 20 Oct 2024 9:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top