Supreme Court : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुनावणीची तारीख ठरली
X
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी बुधवारी सकाळी सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र यानंतर न्यायालयाने सेबीच्या प्रकरणानंतर याप्रकरणी सुनावणी घेणार असल्याचे म्हटले.
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सेबीच्या प्रकरणानंतर 3.30 वा. सुनावणी करू असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यातच आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :- ठाकरे गटाच्या आमदाराने नावात जोडलं उध्दव बाळासाहेब ठाकरे
दुसरीकडे महाराष्ट्राती सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आजपासून मेरिटच्या आधारे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची याचिका मेन्शन करून घेतल्याने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील दोन प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत.